🔸आमदार श्री.संतोषराव बांगर यांचे कृषिमंत्री श्री.दादासाहेब भुसे यांना निवेदन

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.8सप्टेंबर):-हिंगोली जिल्ह्याचा कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग, उडिद, हळद, केळी व कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार श्री.संतोषराव बांगर यांनी कृषिमंत्री श्री. दादासाहेब भुसे यांना केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED