

🔸अन्यथा शेतकऱ्यांसह शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार
✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697
माजलगाव(दि.8सप्टेंबर):-तालुक्यात काल रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे ऊस प्रंचंड प्रमाणात पडला असून पडलेल्या ऊसाचे कृषि विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसह शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असा ईशारा शिवसंग्रामचे युवा नेते इंजि. अक्षय शिंदे यांनी दिला आहे.
माजलगाव तालुक्यासह वडवणी भागातील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात ऊसाची लागवड केली होती. गेल्या चार महिन्यांपासून कोरोणा सारख्या महाभयंकर महामारीला तोंड देऊन अनेक अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी शेतात राबून पिके जोपासली होती. यंदा झालेला चांगला पाऊस आणि पोषक हवामानामुळे ऊसाची वाढही चांगली झालेली होती मात्र काल रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि पावसाने काही पिकांना जीवदान मिळाले तर ऊसाचे तोंडाशी आलेले उभे पीक मात्र भुईसपाट झाले.
तालुक्यात हजारो हेक्टर ऊस भुईसपाट झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू नसल्याने पडलेल्या ऊसाची म्हणावी तशी वाढ होणार नाही पडलेल्या ऊसाचे डोळे जमिनीला टेकल्यामुळे त्याला फुटवा होऊ शकतो तसेच ऊसाला उंदरही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही ऊस पडल्यामुळे त्याची मेहनतही करता येणार नाही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झालेले आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे ऊसाचे खूप मोठे नुकसान झाले असून लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसह शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असा ई शिवसंग्रामचे युवा नेते इंजि.अक्षय शिंदे यांनी दिला आहे.