कुंभोज येथें मुख्यमंत्री फंडातून सांस्कृतिक सभागृह देण्यात यावे

6

🔸विजयकुमार भोसले यांनी केली मुखमंत्रांकडे मागणी

✒️कुंभोज (पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुंभोज(दि.8सप्टेंबर):-येथे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सभागृहाची आवश्यकता असल्यामुळे येथे मुख्यमंत्री फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा,अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समनव्यक विजयकुमार भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केले आहे.

कुंभोज ता . हातकणंगले जि . कोल्हापुर या गावची सर्व जाती धर्माची मिळुन लोकसंख्या 30 हजार आहे . गावात सार्वजनिक उपक्रमाला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आदयावत सांस्कृतिक सभागृह नाही. मुख्यमंत्री फंडातुन सुसज्ज असे आदरणीय ” प्रबोधनकार ठाकरे ” या नावाचे सभागृह व्हावे असे गावातील सर्व विचारांचे संस्था, संघटना व पक्ष यांचे एकमत आहे.

गावकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली की,आपल्या मुख्यमंत्री फंडातुन आदरणीय प्रबोधनकार ठाकरे ” या नावाचे सभागृह जे सांस्कृतिक व सामाजिक उपयोगी पडेल असे मंजुर करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती.विजयकुमार भास्कर भोसले* (राज्य समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग) यांनी दिली.