विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे

8

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8सप्टेंबर):- विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम प्राधान्य असते. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वतः धावून जातात. निलमताईंची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे शुभेच्छापर भाषण करतांना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.