🔹कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टने दिला पुरस्कार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.8सप्टेंबर):-कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजचे नायगांव प्रतिनिधी तथा मराठा मावळा संघटनेचे तालुकाध्यक्ष कानोले साईनाथ गणपतराव रुईकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून व मानवतेच्या दृष्टीने कोवीड-१९ या विषाणूंच्या विरोधी ग्रामीण भागात बातमीतून अत्यंत जबाबदारीने जनजागृती केली, सामाजिक जाणिवेतून मदत नाहीतर हे आपले कर्तव्य आहे, समजून आपणासही समाजाचे काही देने लागते या भावनेतून लाॅकडाउच्या संकटं काळात कुठलीच प्रसिद्दी न करता अमुल्य योगदान दिले.

नेहमीच मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून मोलाचे कार्य करतात कार्य कुशलतेने सेवेची भुमिका बजावत असतात त्यांच्या या उल्लेखनीय जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट चे  नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी त्यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या न्युज शी बोलतांना व्यक्त केले, कोनोले साईनाथ गणपतराव रूईकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED