अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामे करून तत्काळ मदत करा- सुनील ठोसर

36

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.8सप्टेंबर):-बंगाल पिंपळा, मादळमोही, आदि अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप नुकसान झाले आहे..सोयाबीन, मुग, कापूस, ऊस, ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्यात यावी. अशा परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी तातडीने जास्त पाऊस होऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा कष्टाने पिकवलेले तोंडात ला घास आज जातोय. शेतामध्ये राब राब राबवून शेवटी काय परस्थिती त्यांच्यावर आहे.

आत्महत्या करायची वेळ आली आहे. लोखो रूपांयचे नुकसान झालेले आहे.. तातडीने महसूस विभागाने पंचनामे करून त्यांना नुकस्तानग्रस्त पिकांचे भरपाई चे आदेश काढावे. शेतकरी कोरोनाच्या काळातुन पुढे आला आणि आता पावसाच्या जाळ्यात अडकून पिकांचे नुकसान होऊ लागले. या संदर्भात बीड जिल्ह्यातील सर्व शेतकर्यां सोबत रयत शेतकरी संघटना पाठपुरावा करण्यासाठी सोबत आहे.

येत्या ८ दिवसांमध्ये सर्व शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे झाले पाहिजे. काही काळजी करू नका जिथे शेतकर्यांना अडचण आल्यास तिथे लगेच आमच्या पथकांशी संपर्क सांधावा..तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहचवा तिथे नक्कीच आम्ही तुमच्या मदतीस धावू जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तो पर्यंत रयत शेतकरी संघटनेचा पाठपुरावा कमी पडणार नाही. यात शंका नाही..