आता LPG गॅस हंडी घरपोच वितरण करताना शुल्क घेतल्यास होणार कारवाई

29

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपारी(दि.8सप्टेंबर):- एलपीजी सिलिंडर वितरण करताना होम डिलिव्हरी चार्ज आकारणी केल्यास या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असा निर्णय गॅस वितरण करणाऱ्या देशातील तीनही कंपन्यांनी घेतला आहे हा मॅसेज थोडासा मोठा होईल मात्र माहिती महत्वाची आहे आपण व्यवस्तीत सजून घ्या.

तसे तुम्हला माहिती असेल कि अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्यावतीने २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसाठी घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते. मात्र नंतर असे शुल्क आकारू नये असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हटले आहे. मात्र राज्यात अजूनही अनेक भागात अशा प्रकारचे शुल्क आकारणी होत आहे. हि समस्या दूर करण्यासाठी काल सोमवारी ७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅईल  या तीनही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. कंपनीचे सहायक व्यवस्थापक स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले  सध्या गॅस सिलिंडरचा जो दर आहे -तेवढीच रक्कम घरपोच हंडी देताना घ्यावयाची आहे.

त्या पेक्षा जास्त शुल्क तर घेताच येणार नाहीत तसेच महत्वाचे म्हणजे ही हंडी -जर ग्राहकाने गोदामातून घेतली असेल किंवा वितरण करणायाने घरपोच न देता चौकात उभे राहून ग्राहकाला हंडी दिल्यास ग्राहकाला २७.५० रुपये हंडीच्या मुल्यातून परत द्यावे लागतील – असेही कंपनीचे सहायक व्यवस्थापक – स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले- सप्टेंबर महिन्यात हंडीचे जे दर आहेत त्यापेक्षा पेक्षा वितरकांनी एक रुपयाही जास्त घेऊ नये असे स्पस्ट निर्देश त्यांनी दिलेत.