एक ती गृहिणी

37

खरंच कौतुक करावं तितकं कमी पडेल अन् किंमत लावावी म्हणावी तर अमूल्य आहे. ती म्हणजे एका गृहिणीच्या कामाची किंमत. मुलगा कामाला जातो पण चिंता अमाप असतो. बाळा नाश्ता कर ना! बाळा डबा घेतला का? व्यवस्थित जा अॉफीस ला. लंच ब्रेक ला डबा खाऊन घे हं. असे एक ना अनेक सूचना देत आपल्या बाळाला आपल्या लेकराला बाय करते. सून जेव्हा जॉब ला जायला निघते सासूबाईंना म्हणते आई मी लवकर येईन आपण मस्त स्वयंपाक करुया दोघेही. असं म्हणणारी ती पण एक गृहिणीच‌!

अडीअडचणीला पैसे तांदळाच्या डब्यात साठवून ठेवणारी ती गृहिणीच असते. अहो! तुम्ही जाताय ना अॉफीस ला तर जरा लवकर याल जेवायला पण हो मला फोन करा हं मी तुम्हाला गरम गरम स्वयंपाक करून ठेवते. आपण सोबत जेवण करुया. खरंच एका गृहिणीची किंमत तिच्या मायेची तिच्या प्रेमाची किंमत ही अमूल्य असते. कधीच तिची किंमत होऊ शकत नाही. घरात राब राब राबते पण ते स्व:खुशीने! कधीच कंटाळा न करता करत असते. बायको किती गोड असते.

कधी मनातलं जाणून घेण्यासाठी मैत्रीण बनते. खांद्यावर हात ठेवून धीर देते. खरंच ही गृहिणी देवाची देणगी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा गृहिणींना माझा खरंच सलाम आहे. खरंच सून,आई,ताई अतिशय प्रेमळ असतात त्यांना जपा खूप मौल्यवान आहेत त्या. कधीही त्यांना एकटं सोडून नका. जेव्हा जेव्हा ती जेवण बनवते घरातले सारे खाऊन समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो ना तो जगात कुठेही मिळत नाही हा तिचा विचार असतो. त्यामुळे तिला कधीही गमावू नका. गृहिणींना कोटी कोटी प्रणाम…

✒️लेखक:-अनिकेत मशिदकर(शब्द भ्रमर)
नाशिक -मो:-7507627329

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
(अहमदनगर विशेष प्रतिनिधी)
मो:-9404322931