मालेगाव तालुक्यातील गोव्हा कुटे गावातील नागरिकांना न्याय न मिळाल्यास शिवसेनेतर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा

    40

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

    मालेगाव(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील गोव्हा कुटे गावातील नागरिक जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून तेथे राहत आहेत. त्यांतील काही लोकांची मालकीची नोंद नसल्यामुळे त्यांची नोंद करून घ्यावी अशी शिवसेनेने मागणी केली होती. तेथील नागरिकांची जागेची नोंदणी नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा झाला नाही.

    त्यामुळे यांची नोंदणी करून घ्यावी असे निवेदन तहसीलदारांना दिले होते. तेथील लोकांना न्याय न मिळाल्यास शिवसेनेचे मालेगाव तालुका प्रमुख उद्धवजी गोडे, शाखाप्रमुख बाळू शिंदे, उपशाखाप्रमुख सचिन राठोड यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असे सांगितले आहे.