मिलिंद वाडकड यांची धारूर तालुका आँल इंडिया पँन्थर सेनेच्या युवा सरचिटणीस पदी नियुक्ती

22

✒️समाधान गायकवाड(माजलगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

धारुर(दि.9सप्टेंबर):-आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व विनोद भोले यांच्या आदेशाने बीड जिल्हा युवा अध्यक्ष गोविंद उजगरे यांनी मिलिंद वाडकड यांची धारूर तालुका युवा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. धारुर तालुका हा ऑल इंडिया पँथर सेनेचा बालेकिल्हा होत असून येणाऱ्या काळात या बीड. जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने संघटनेत सामील होणार आहेत.

आँल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे.दलित,पिढित,,वंचित,शोषित,मुस्लिम,आदिवासी घटकांचा आवाज होत आहे.त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.
या साठी लढाऊ पँथरच संघटन धारूर तालुक्यात वाढतानां दिसत आहे. मिलिंद वाडकड यांच्या निवडीचे धारुर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात येत असुन त्यांच्यावर सुभेच्छाचा वर्षाव होत आहे…