✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.ही बातमी दि. ०८ सप्टेंबरला जवळपास सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये वृषालीच्या वडीलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना ब्रम्हपुरी तर्फे वृषालीला उपचाराउपचारासाठी 10000/- रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अरविंद रामकृष्ण मसे यांनी 10000/- रुपये रोख वृषालीचे वडील दिगांबर शेन्डे याचेकडे सुपूर्द केले. त्याबद्दल दिगांबर शेन्डे यांनी शिक्षक संघटनेचे आभार मानले.

यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे तालूका अध्यक्ष दिलीप बावनकर, सचिव शिवणकर सर, बाबुराव दोनाडकर, नरेश पिलारे, गुणवंत ठाकरे, गायधने सर व पदाधिकारी, उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED