तीन दिवस उलटून सुध्दा वृषालीची तब्येत गंभीरच

34

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.ही बातमी दि. ०८ सप्टेंबरला जवळपास सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये वृषालीच्या वडीलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

आणि तशी मदत पण सर्वाकडून मिळाली. काही संघटनांनी , काही लोकांनी एकत्रीत येऊन वृषाली ला आर्थिक मदत मिळाली, पैसाचा प्रश्न मिटला पण आता वृषालीच्या जीवनाचा प्रश्न समोर आलाय, तीन दिवस होऊन सुध्दा वृषलीची प्रकृती गंभीर आहे. वृषलीची तब्येत केव्हा ठीक होईल याच्या प्रतीक्षेत घरचे आई- बाबा व गावकरी वाटच बगत आहेत. वृषाली लवकरात लवकर ठीक होवो अशी सर्वांची आता ईश्र्वर चरणी प्रार्थना आहे.