अखेर पंचावन्न तासानं वृषाली मुत्युंशी झुंज संपली

19

🔹सर्पदंश झालेली वृषाली शेंडे हिने घेतला अखेरच्या श्वास

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आणि आज अठेचालीस तासानंतर सर्वांची लाडकी आपल्या आई- बाबांना आणि झिलबोडी गाववासियाना सोडून गेली. वृषाली सोडून गेल्याने अख्खा ब्रम्हपुरी तालुका हादरून गेला आहे. आता वृषाली ला एकच गोष्ट ब्रम्हपुरी तालुका देऊ शकतो ती म्हणजे वृषालीचा आत्म्याला शांती समाधान ईश्र्वर देवो. सर्व गावातील लोकांनी व ब्रम्हपुरी वासियानी वृषालीला आदरांजली वाहिली आहे.