शिक्षक दिनाचे औचित्य साधत मंगरूळ ता.घनासावंगी येथे झोपडपट्टीचे नामकरण

27

🔹मिटले जाणार झोपडपट्टी हे नांव आता माता सावित्रीबाई फुले नगर म्हणून संबोधले जाणार

🔸युवा व्यवसायीक प्रभाकर मगरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले नामकरण

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

घनासावंगी(दि.10.सप्टेंबर):- तालुक्यातील मंगरूळ या गावात अत्यंत पुर्वी पासून झोपडपट्टी या नावाने संबोधले जाणाऱ्या व सर्व समाजातील रहिवाशी राहत असलेल्या परिसराचे शिक्षक दिनाचे औचित्य साधत जेष्ठ नागरिक गोरख जिजा शरणांगत यांच्या यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करीत व उदघाटन करीत नामकरण करण्यात आले.आता या परिसराला माता सावित्राबाई फुले नगर म्हणून संबोधले जाईल सदरील नामकरण करण्यासाठी युवा व्यवसायीक प्रभाकरजी मगरे व मंगरूळ गावात सर्वांना हवेहवेशे वाटणारे सामजिक कार्यकर्ते महादेव भाऊसाहेब शरणांगत यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे.

सदरील परिसरामध्ये जवळपास सर्व समाजाचे नागरिक वास्तव्यास असून एक आदर्श डोळ्यासमोर असावा म्हणून स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या माता सावित्रीबाई फुले यांचे नांव त्या परिसरास देण्यात आल्याचे व एक गलिच्छ नांव पुसण्याचे कार्य करण्यात आले असे पुरोगामी संदेश न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना प्रभाकर मगरे यांनी सांगीतले.सदरील परिसराला आता माता सावित्राबाई फुले नगर असेच संबोधण्यात यावे असं आवाहनही त्यांनी केलं.

नामकरणाच्या वेळेस बबनराव हरिभाऊ शरणांगत, विठ्ठल रोहिदास शरणांगत,रणोजी मगरे साहेब,मुकेश मल्टीसर्विसचे मालक मंगेश संतराम उनवणे,अशोक विठ्ठलराव खरात,सुनिल तुकाराम खरात, नानासाहेब लक्ष्मण शरणांगत,भाऊसाहेब गोरख शरणांगत,रखमाजी लक्ष्मण शरणांगत,राजाभाऊ जनार्दन शरणांगत, यांच्यासह गावातील नागरिक, महिला मंडळ, युवक मंडळ व नव्याने नामकरण करण्यात आलेल्या माता सावित्राबाई फुले नगरमधील सर्व रहिवाशी यांची उपस्थिती होती.