गुत्तेदार पोसण्यासाठी दलितांच्या चुली बंद करणाऱ्यां कॉग्रेसच्या नगराध्यक्षाचां जाहीर निषेध – राजेश वाहुळे

27

✒️ समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

अंबेजोगाई(दि.10सप्टेंबर):-शासनाच्या वतीने एका स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ७०० रुपये मिळत असतांना सुद्धा अंबाजोगाई नगरपरिषद च्या चुकीच्या धोरणामुळे फक्त गुत्तेदार पोसण्याच्या हट्टापोटी अंबाजोगाई नगरपरिषद चे मुखधिकारी व नगराध्यक्षा मग्न आहेत याचा विरोध म्हणून येथील स्वच्छता कर्मचारी उपोषणास बसले आहेत.

जर या कर्मचाऱ्यांना २५० रुपये रोजगार मिळत असेल तर४५० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यां मागे जातात कुठे या मागे नगरपरिषद चा मोठा भ्रष्ट्राचार करणारा गट सक्रिय आहे आणी तो गट एका मोठया नेत्याच्या हुजरेगिरीत मग्न आहे या चुकीच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे सत्ताधारी यांनी लक्षात ठेवावे की तुम्ही सत्तेवर दलित व मुस्लिमांच्या मतावर सत्तेची फळे चोकत आहेत त्याचं समाजावर तुम्ही जाणीवपूर्वक अन्याय करत आहात या विभागात जवळपास ८०% कर्मचारी महार व मांग आहेत.

१०% कर्मचारी मुस्लीम आहेत व उर्वरीत १०% समाज या विभागात काम करतो उच्च वर्णीय असल्यास तुम्ही त्या कर्मचाऱ्यांची पात्रता नसतानासुद्धा लाभाचे पदे देतात का तर ते तुमचे आर्थिक व भ्रष्टाचाराचे गणित जुळवतात या गोष्टी लोकजनशक्ती पार्टी आता जनतेसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीं तुम्ही आमच्यावर अन्याय कराल तर तुमचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत,असा ईशारा लोकजनशक्ती पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष मा.राजेश वाहुळे यांना प्रशासनाला दिला आहे.