नेहरू युवा केंद्र वर्धा च्या वतीने परडा येथे कोरोना स्वाब टेस्ट

    43

    ✒️सचिन महाजन (तालुका प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

    हिंगणघाट(दि.10सप्टेंबर):-नेहरू युवा केंद्र वर्धा च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, परडा येथे कोरोना स्वाब टेस्ट समुद्रपूर तालुक्यातील स्वयंसेवक नितेश क महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ श्री सागर बोबले सर यांनी मार्गदर्शन केले व लाँब टेस्टींग शितल ठाकरे मॅडम यांनी स्वाब नमुने घेतले.

    नर्स सौ झामरे मॅडम, सरपंच सौ सुवर्णाताई रा तडस व उपसरपंच श्री बंडूजी मून व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव महाजन, श्री पांडुरंग मडावी, सौ सुरेखाताई धोटे, सौ संगीताताई वि घाटुलेँ, सौ वनीताताई ग पाल, सौ सारीकाताई घुमडे, सौ वनीताताई बुरीले व ग्रामपंचायत शिपाई संजय बारई व अमोल सावसाकडे तसेच गावातील मंडळींनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.