चिमूर न.प. प्रभाग ५ च्या विकास कामात मनमानी करणाऱ्या कंत्राटदार वर कारवाई करा

27

🔸न.प. बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी दिले मुखधिकारी यांना निवेदन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.10सप्टेंबर):- नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग ५ मध्ये खनिज विकास निधीतून विविध ठिकाण चे मंजूर कामे झाली असताना मात्र मंजूर यादीतून कामे होत नसल्याचा आरोप नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी करीत कामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदार वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चिमूर नप अंतर्गत प्रभाग ५ मधील माणिक नगर येथील मांडवकर ते धोटे यांच्या घरापर्यत नाली चे बांधकाम करीत असताना पूर्वीच्या नाली वर बांधकाम रिपेरिंग करीत असल्याचा आरोप नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केला आहे त्या ठिकाणी पूर्वी नाली बांधकाम होते तेव्हा कंत्राटदार यांनी एक बाजू ची नाली बांधकाम तोडून त्याच जागेवरून रिपेरिंग करीत असल्याचे निदर्शनाश आले आहे.

नाली बांधकाम तोडण्याची नप कडून परवानगी घेतली नसताना बेकायदेशीर कशी तोडली असा सवाल सुद्धा करीत सभापती अब्दुल कदिर शेख यांनी मांडवकर ते धोटे यांच्या घरा पर्यत च्या नाली बांधकाम ची चौकशी करून मनमानी करणाऱ्या कंत्राटदारावर मौका चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली असून यासंबंधीचे निवेदन नप सीओ व पिडब्लूडी उपविभागीय अभियंता सोनवाल यांना सुद्धा देण्यात आले.