🔸राज्य सरकारला मोठा इशारा

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.10सप्टेंबर):- घुंगराळा येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक घुंगराळा येथे काळी रिबीन बांधुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असताना सरकार मात्र रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत च्याच मागे गिरट्या घेताना दिसुन येतंय.

सरकार ला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसुन मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचं काम केलेले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रेवेशास व नौकर भरतीत केलेलं आरक्षण बाद ही सरकारचीं सपशेल हार असुन यामुळे सकल मराठा समाजात संतापाची पसरली असुन त्याची सुरुवात ही नांदेड जिल्ह्यात घुंगराळा येथे झालेली आहे.

यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाधयक्ष प्रभाकर ढगे पाटील, मोहन सुगावे पाटील, बालाजी ढगे पाटील, गंगाधर ढगे पाटील, रोहिदास ढगे पाटील, आकाश कदम पाटील, मोहन ढगे पाटील,प्रकाश ढगे पाटील, सचिन ढगे पाटील, ज्ञानेश्र्वर ढगे पाटील, आशिष ढगे पाटील, प्रदीप सुगावे पाटील,शिवराज यलपलवाड, खंडू बोंडले,खंडू यमलवाड, पांडू बोंडले, ओमकेश ढगे पाटील व मराठा न्युज प्रतिनिधी कानोले साईनाथ इतर उपस्थित होते…

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED