एक महिन्यातच नवीन रोड ची लागली वाट

10

🔹निकृष्ट दर्ज्याचे रोडचे काम

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.11सप्टेंबर):- तालुक्यातील अर्हेर – नवरगाव ते ब्रम्हपुरी हे एकमेव दळणवळणाचे रोड आहे. या रोडचं नविनिकरण झालं परंतु एक महिन्यातच रोडच काम निकृष्ट दर्जाचं दिसून आल.या गावातील नव्वद टक्के लोक ब्रम्हपुरीला कामासाठी जात असतात. आणि अर्हेर – नवरगाव हे भाजीपाला पिकवण्यात चांगले गाव असल्या मुळे, या गावासाठी ब्रम्हपुरी हे सब्जी मार्केट एकमेव ठिकाण आहे. शेतकऱ्याला भाजीपाला नेण्यास या रोड नी खूप त्रास होतो.

तसेच शाळकरी मुलं सुध्दा मोठ्या प्रमाणात शाळेत, ‌काॅलेज मध्ये जात असतात त्यांना पण खूप मोठ्या प्रमाणात ये – जा करण्यास त्रास होतो. या सर्वांचं दळणवळणाचा त्रास लक्ष्यात घेता प्रशासनाने रोड ची पाहणी करून, व रोड चे खड्डे , रोडची दुर्वस्था दूर करून अर्हेर – नवरगाव वासियांना योग्य तो न्याय द्यावा.