पुरोगामी पत्रकार संघाची बीड शहरात जिल्हास्तरीय प्रशिक्षण व चिंतन बैठक

11

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.१०सप्टेंबर):- बीड येथील शासकीय विश्रामगृहात पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजीत बीड जिल्हास्तरीय प्रशिक्षण व चिंतन बैठक सोहळा पार पडला.या बैठक समारंभाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजय सुर्यवंशी साहेब ,राज्य उपाध्यक्ष प्रा.दसरथ थोडे सर, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत नाना कांबळे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष मा.विजयकुमार व्हावळ सर,राज्य संघटक मा. भागवतजी वैद्य, मराठवाडा पदाधिकारी अंबाजोगाई चे पत्रकार स.का.पाटेकर सर इत्यादी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीड जिल्हा पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.बालाजी जगतकर सर‌ हे होते.सदरील कार्यक्रमात पत्रकारांना सामाजिक,न्याय, आर्थिक,धार्मिक या विविध क्षेत्रात काम करत असताना येणार्या समस्यांवर अडचणी यांवर चिंतन करून सखोल अशी चर्चा‌ झाली.पत्रकारिता या क्षेत्रातील विविध पैलू कसे हाताळले जावेत पत्रकार हा त्याच्या क्षेत्रात काम करत असताना निर्भिड व व्यापक असावा यावर मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना सखोल असं मार्गदर्शन केले.

भविष्यातील पुरोगामी पत्रकार संघाची फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांवर आधारित ‌ध्येय धोरणं ही यावेळी आखुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदरील कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपापल्या परिने कोरोणा काळात जीव तोडून उल्लेखनीय कार्य काम करणाऱ्या महिला समाजसेविंकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या निवडी करुन त्त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रक ही देण्यात आले.या मध्ये जिल्हाधिकारी जवळपास सगळ्या तालुक्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे पुरोगामी पत्रकार संघाचे केज तालुका सचीव आदरणीय दत्ता मुजमूले सर यांनी केले तर आभार गेवराईचे विश्वनाथ शरणांगत यांनी मानले.