एक अभिनेता आत्महत्त्या करतो
तेंव्हा सारं जंग त्यांत मग्न्न होतं
मरतो जेंव्हा आत्महत्त्यानी शेतकरी
तेंव्हा तुमच्यातल प्रेम कुठं जातं

अहो तुम्ही राजकीय आहात की
लहान लेकरे,थांबवा तुमचे हे चाळे
घाला जरा लक्ष्य माझ्या महाराष्ट्रात
टाका संपवुन हे कोरोना चे जाळे

आम्हांला वाटलं होतं आमचे नेते
काही सेवा योजना करत असतील
कधी विचार सुध्दा केला नव्हता की
नको त्यांच राजकारण करत बसतील

लहान लेकरा सारखे एकमेकांनावर
करतायत नेहमीच तुम्ही टिका इथं
गरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न देता सोडुन
अन करतात राजकारण जिथं तिथं

विरोधक असो वा सत्ताधारी दोघेही
अता आम्हां शेतकऱ्यांसाठी लढा
नेत्यांनो हात जोडुन विनंती करतो
कश्याच ही राजकारण करणं सोडा

कवी:-अंगद दराडे
माजलगाव बीड
मो:-8668682620

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED