शेळगाव ते कुंटूर रस्ता दुरूस्थीचे काम म्हणजे थुका पॉलिसच – रामकिशन पालनवार.

35

✒️ चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.11सप्टेंबर):-सध्या शेळगाव ते कुंटूर हा रोड थातुर- मातुर दुरूस्थीच्या नावाखाली ही थुका पॉलिसी असल्याचे मत या भागातील कोकलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामकिशन पालनवार यांनी दिलेल्या निवेदनात व्यक्त केले. नायगाव कुंटूर उमरी हा राज्य महामार्ग क्रमांक 264 असुन दुरुस्थीच्या नावाखाली फक्त खड्डे भुजवण्याचे काम चालु आहे.

नायगाव व ऊमरी हा सतत वर्दळीचा रोड असुन हे दोन्ही शहरे शेतकर्यासाठी फारमोठी बाजारपेठ असुन ह्या रोडचे ईमाने ईतबारे काम केल्यास व दुहेरीकरण केल्यास त्याचा फायदा निश्चितच या भागातील प्रवासी, शेतकरी, विध्यार्थी व्यावसायिक या वर्गाला होईल. म्हणून सदरील धुळफेक डागडुजी थांबवून हा पक्का रस्ता तयार करण्याची माफक मागणी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्या कडे केली आहे.