ऑक्सिमिटर थर्मामीटरच्या नावाखाली मनपा कडून व्यापाऱ्यांची लुट

17

🔸मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल घेतला समाचार

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

औरंगाबाद(दि.11सप्टेंबर):-मनपातर्फे व्यापाऱ्यांकडे ऑक्सिमिटर व थर्मामीटर यंत्र नसल्याचे क्षुल्लक कारण देत गुंडशाही पद्धतीने व दमदाटी करून दुकाने बंद करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना हडकोतील मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल समाचार घेतला.

आधीच भरमसाठ आलेलं विजबिल व अनेक महिने व्यापार ठप्प असल्याने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांनी याबाबत मनसेकडे तक्रार करताच शहर उपाध्यक्ष गणेश साळुंके, शहर सहसचिव दिपक पवार, विभाग अध्यक्ष अविनाश पोफळे, युवराज गवई यांनी दहशत माजवत फिरणाऱ्या सात ते आठ मनपा कर्मचाऱ्यांना एम-२ हडको भागात गाठून जाब विचारला, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यानी मनपा कर्मचाऱ्यांना अक्षरशः पिटाळून लावले.

त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी स्वतः फिरून सर्व दुकाने उघडण्याचे आवाहन करून नागरिकांना व व्यापाऱ्यांना दिलासा दिला.याबाबत परिसरातील व्यापाऱ्यांनी सर्व मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले..