288 आमदारांना धनगर समाजाची ऍलर्जी आहे काय? – दत्ता वाकसे

19

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.11सप्टेंबर):-गेल्या दोन चार दिवसापूर्वी दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन संपले असून त्यामध्ये विविध विषयावर विधानपरिषदेच्या आणि विधानसभेच्या सभागृहात मध्ये विविध विषयावर चर्चा झाली परंतु ज्या धनगर समाजाने विधानभवनातील विधानपरिषदेचे आणि विधानसभेच्या 288 आमदार पैकी जवळपास शंभर ते दीडशे आमदारांना विधान विधानसभेमध्ये पाठवण्याचे काम विविध मतदारसंघातील धनगर समाजाने केले आहे परंतु त्यांना त्यांचा विसर पडला आहे.

एकाही आमदाराने विधानपरिषदेचे अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्नी आवाज उठवला नाही असा सवाल धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केला आहे पुढे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आगामी काळात धनगर समाजाचे युवकांनी आपल्या मतदारसंघातील आमदारांना जॉब विचारावा की आम्ही आम्ही आपणास मते देऊन विधानसभेमध्ये पाठवले परंतु तुम्ही आमच्या हक्काच्या धनगर आरक्षण प्रश्नी आवाज का उठवला नाही त्याच बरोबर धनगर समाज हा प्रत्येक मतदार संघामध्ये 70 ते 80 हजार पन्नास हजाराच्या आसपास आहे यामुळेच राज्यातील जवळपास शंभर ते दीडशे आमदार हे निवडून आलेले आहेत.

परंतु त्यांना धनगर समाजाचा विसर पडला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज्यातील धनगर समाजाच्या युवकांनी व धनगर समाजाने आपापल्या मतदारसंघातील आमदारांना विचारावा विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न आवाज का उठवला नाही आणि आगामी काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा काम मताच्या माध्यमातून करावे राज्यामध्ये जवळपास धनगर समाज हा दीड कोटीच्या आसपास आहे परंतु त्यांना वेळोवेळी डावलले जात आहे आमच्या मताच्या माध्यमातून आमदार होऊन मात्र आम्हाला विसरले जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये विविध मतदारसंघातील युवकांनी आमदारांना रस्त्यावर फिरू देऊ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीच्या 22 योजना लागू केल्या होत्या परंतु या सरकारने त्या रद्द करून धनगर समाजाची घोरफसवणूक केली आहे.

धनगर समाजाला घरकुल योजना चालू केली आहे परंतु त्या योजनेला निधी उपलब्ध नाही त्यामुळे त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे हेळसांड केली जात आहे असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.