चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार

    35

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(दि.11सप्टेंबर):-मुख्याध्यापक संघ चंद्रपुर जिल्ह्याच्या वतीने दिनांक 2 स्प्टेम्बर 2020 ला गुणवंत विद्यार्थांचा सत्कार विद्यार्थांच्या स्वगृही जाऊन घेण्यात आला.यावेळी चिमुर तालुक्यातुंन शैक्षणिक क्षेत्रात उज्जव यश संपादन करणारे विधार्थ्यांचा चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वतीने नेहरू कनिष्ठ महा विद्यालय येथील कला शाखेतिल 84,76% घेत आकाश श्रावन रंदये, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय वाणिज्य शाखेमधुन 84,76% घेत कुमारी मुक्ता ईश्वर कामडी, नेहरू कनिष्ठ महाविद्यालय विद्यान शाखेमधुन 74,30% सचिन मोरेश्वर जांभुले तर नई राष्ट्रीय विद्यालय मधून सिद्धान्त कवडू गेडाम 10 मधून तालुक्यात प्रथम आल्याबड्डल त्याच्या स्वगृही जाऊन सत्कार करण्यात आला.

    या वेळी संघटनचे सचिव विनोद पिसे, संघटक भक्तदास जिवतोडे, सदस्य हंसराज गजभिये, नेहरू विद्यालय चिमुरचे प्राचार्य सुधिर पोहिनकर, न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूरचे मुख्याध्यापक किशोर खोब्रागडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूरचे प्रा.राकेश कुमरे सर, यांचे सह निशिकांत मेहरकुरे सर, प्रा. कढव , प्रा. अभिजीत गोमासे , प्रा.घाटे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.