नेहरु नगर (चंद्रपूर) येथे “अाप” तर्फे ‘अाॅक्सिजन मित्र ‘ उपक्रम

    37

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपुर(दि.11सप्टेंबर):- अाम अादमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुचनेनुसार अाप तर्फे सपुर्ण देशभरात “अाॅक्सिजन मीत्र” उपक्रम सुरु केला अाहे.कोरोणाच्या पार्श्वभुमीवर चंद्रपुर मध्ये वाढलेली रुग्णसंख्या पाहता अाम अादमी पार्टी माहानगर तर्फे घरोघरी जाउन नागरिकांची अाॅक्सिजन पातळी तपासने हा उपक्रम राभविण्यात येत अाहे. नेहरु नगर वार्डात या उपक्रमाला चांगला प्रतीसाद मीळत अाहे.

    कोविड हा श्वसन संस्थेचा अाजार अाहे.सुमारे 15 टक्के रुग्णामध्ये अाॅक्सिजनची पातळी कमी झाल्याने श्वसनाचा त्रास होऊ शकतो. अाणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागु शकते कोविडच्या 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसुन येतात अनेकाना तर लागन झाली अाहे. हे समजुन सुध्दा येत नाही.काही जणांमध्ये अचानक अापल्या शरिरातील अाॅक्सिजनची पातळी खालावली जाऊन गुंतागुंत होऊन परिस्थिती गंभीर होऊन शकते. अाप चे कार्यकर्ते मास्क घालुन, सॅनीटायझरने बोट साफ करुन अाॅक्सिजनची पातळी तपासत अाहे. नागरिकांच्या घरोघरी जाउन अाप तर्फे अाॅक्सिमीत्र उपक्रम राभवित अाहे.

    नेहरु नगर मध्ये अाप उपाध्यक्ष योगेश अापटे, गिरीश राऊत यांच्या नेतृत्वात तर विठ्ठल मंदिर वार्ड , समाधी वार्ड, पठाणपुरा वार्ड मध्ये सुनिल भोयर, प्रशांत येरणे, अजय डुकरे च्या नेतृत्वात, बाबुपेठ मध्ये राजु कुडे, सुखदेव दारुडे, यांच्या नेतृत्वात अाॅक्सिमित्र अभियान सुरु अाहे. नागरिकांनी स्वताहुन अापल्या शरीरातील अांक्सिजनची मात्रा तपासुन घ्यावे. अशी विनंती अाप माहानगर तर्फे करण्यात येत अाहे.