युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

15

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.11सप्टेंबर):-युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्ह्याच्या वतीने एकता कपूर त्यांनी निर्माण केलेल्या वर्जिन भास्कर या सेक्स विषयक च्या वेब सिरीज मध्ये राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक,महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वापरून महापुरुषांचे अवमान आणि समाजात रोष निर्माण केल्याप्रकरणी निर्माते,दिग्दर्शक यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पावडे, तालुकाध्यक्ष जामुवंत मारकड, युवक तालुकाध्यक्ष विकास हराळ, शहर प्रमुख अरुण पावडे, विकास काचगुंडे, गजानन रवणे, समाधान मस्के, सुनील गडदे, गणेश वडकुते यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.