जेष्ठ पत्रकार प्रा. बाळासाहेब गजभिये व पत्रकार अरविंद चुनारकर यांना भावपुर्ण आदरांजली

6

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.12सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालूका पत्रकार सघांचे सदस्य व जेष्ठ पत्रकार स्व. प्रा. बाळासाहेब गजभिये व पत्रकार स्व. अरविंद चुनारकर यांना तालूका पत्रकार संघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या दोन्ही निर्भीड पत्रकारांच्या जीवनपटावर मार्गदर्शन करण्यात आले.यांची प्रेरणा घेऊन तालुक्यांत अनेक निर्भीड पत्रकार निर्माण होतील अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, सचिव दिपक पत्रे, जेष्ठ पत्रकार जीवन बागळे, नेताजी मेश्राम, प्रा. श्याम करंबे, दत्तात्रय दलाल, गोवर्धन दोनाडकर, शिवराज मालवी, प्रशांत डांगे, नंदू गुड्डेवार, अमर गाडगे, प्रवीण मेश्राम, दिवाकर मंडपे, विनोद चौधरी, अमरदीप लोखंडे, पोलीस राहुल लाखे व अन्य पत्रकार बंधू उपस्थित होते..