
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.12सप्टेबर):- कोरोनाच्या पार्श्र्वभुमीवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच राज्य शासनाने संकेतस्थळावर कामगार हवे असलेल्या कंपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ज्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकत आहे.
व त्यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईडवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली नाही. तसेच आधार कार्ड लिंक केलेली नाही अशा उमेदवारांनी आधार कार्ड लिंक करावे अन्यता अशा उमेदवारांची नोंदणी 30 सप्टेबर 2020 नंतर आपोआप पोर्टलवरुन रद्द होईल यांची कृपया नोंद घ्यावी, असे संबंधित विभागाने कळविले आहे.
सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. अधिक माहितीची आवश्यकता असल्यास या कार्यालयाचा संपर्क क्रमांक 07172-252295 यावर संपर्क साधवा असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भैयाजी येरमे यांनी कळविले आहे. या कार्यालयाचा संपर्क पत्ता सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र.5/6 चंद्रपूर.