काजडसर ग्रा प चे प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी गुंतीवार यांनी पदभार स्वीकारले

14

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.12सप्टेंबर):- वरून जवळ असलेल्या काजडसर ग्रा प चे प्रशासक म्हणून चिमूर प .स चे विस्तार अधिकारी श्री गुंतीवार यांची नियुक्ती झाली आणि आज दि 12 सप्टेंबर ला त्यांनी पदभार स्वीकारला कोरोना संकटामूळे राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपली असून या कोविड मुळे नवीन सरपंच व त्यांच्या सदस्य च्या निवडणुका होऊ शकल्या नाही त्यामुळे राज्य सरकार ने निवडणुका 6 महिने पुढे ढकलून गावातील कारभार सुरळीत व्हावे यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर केली आहे.

त्यामुळे श्री गुंतीवार विस्तार अधिकारी यांची नियुक्ती काजडसर ग्रा. प करण्यात आली यावेळी पदभार स्वीकारताना त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अस्विनी मेश्राम, अँड मिलिंद मेश्राम, जोती मोहूर्ले, लालाजी मेश्राम, विजय सोनवाणे, मनोज बन्सोड , प्रेमीला सोनवाणे, विजय मानकर नंदू हटवादे ,अनिल चौधरी आणि सर्व ग्रा प पदाधिकारी यांनी त्यांचे सत्कार व अभिनंदन केले.