🔹आर पी आय डेमोक्रॅटिक पक्षाकडून पाठपुरावा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.13सप्टेंबर):- राज्यात कोविड मुळे आलेल राहिवाश्यावरील संकट लक्षात घेता आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष्याच्या वतीने घरपट्टी मालमत्ता कर व विजबिलं माफीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले होते, राज्याने सदर प्रकरणी दखल घेऊन मालमत्ता व घरपट्टी पूर्णपणे माफ केली आहे.

घरपट्टी मालमत्ता कर व वीजबिल माफीसाठी राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्यासह एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानि भेटी साठी जाऊन परिस्तिथीवर चर्चा करण्यात आली, ताळेबंद काळात पोटाला चिमटा काढून ज्यांनी वीजबिल भरले आहे ते परत करावेत किंवा जमा ठेव करून पुढील बिलात ती रक्कम वजा करण्यात यावी असे कनिष्क कांबळे यांनी चर्चेत सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटावयास गेलेल्या शिष्ठमंडळात राष्ट्रीय महासचिव व प्रसिद्धी प्रमुख पँथर डॉ राजन माकनिकर, राज्य सचिव पँथर श्रावण गायकवाड यांचा समावेष होता. सातत्याने सदर प्रश्नचा पाठपुरावा आरपीआय पक्षाकडुन माकणीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता त्याचीच प्रचिती आज हा झालेला निर्णय होय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळला त्याबद्दल राज्य सरकारचे पक्षाच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

राज्यातील कोरोनासदृश्य परिस्तिथीत नागरिकांवर आलेल्या भयावह परिस्तिथी शी मात करण्यासाठी विविध योजना सरकारने अमलात आणून त्या काटेकोरपणे राबविण्यात याव्यात याबद्दल कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात डॉ माकणीकर, गायकवाड, बंजारा सेल राज्याप्रमुख शिवाभाई राठोड, उत्तर भारतीय सेल मनीष यादव, दक्षिण भारतीय सेल मुंबई अध्यक्ष राजेश पिल्ले व अन्य पाठपुरावा करत असल्याचेही डॉ माकनिकर यांनी सांगितले.
घर पट्टी, मालमत्ता कर जसा 100 टक्के माफ करण्यात आला तसा विजबिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असाही आशावाद राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.

महाराष्ट्र, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED