नर विर तानाजी मालुसरे शेतकरी गटाच्या वतिनी 16 सप्टेंबर रोजी कृषि कार्यालय नायगाव येथे शेतकर्‍यांचे अमरण उपोषण

    46

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.13सप्टेंबर):-नायगाव तालुक्यातील बरबडा येथिल नर विर तानाजी मालुसरे शेतकरी उत्पादक गटाच्या वतीने नायगाव कृषि कार्यालयासमोर दि16/9/2020 रोजी बरबडा व मणुर त.ब.येथिल शेतकर्‍यांच्या वतिनी आमरण उपोषण करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड , पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेड , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड ,कृषि आयुक्त कार्यालय औरंगाबाद ,कृषि कार्यालय नायगाव ,तहसिल कार्यालय नायगाव , उपविभागीय अधिकारी बिलोली , यांना कळविण्यात आले आहे.

    कारण सन.2017– 2018 व 2018— 2019 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा बरबडा येथील शाखा व्यवस्थापक बियाणी , टिबक व तुषार एजन्ट राम मालेवाड , व काळे व तत्कालिन ता.कृषि अधिकारी काळे यांनी संघमत करुण शेतकर्‍यांना शासकिय आनुदानावर तुषार व टिबक संच वाटप केले .त्या टिबक व तुषार चे पैशे शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यातुण घेण्यात आले.त्या कर्ज खात्यावर 50000 रु .पासुन 400000 लाखापर्यत व्याज व मुद्दल मिळुण झालं आहे .शेतकर्‍यांना टिबक व तुषार देतांना पन्नास ते नव्वद टक्के आनुदान मिळते आशी बनावट माहिती देउन शेतकर्‍यांना खरेदि करण्यास भाग पाडले .पण आतापर्यत एकाही शेतकर्‍यांना टिबक व तुषार चे आनुदान मिळाले नाही तर पिक कर्ज खात्यातुण महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेतुण मिळालेली पैसे बँक व्यवस्थापक बरबडा हे टिबक व तुषार च्या कर्ज खात्यात वर्ग करुण शेतकर्‍यांचे पैसे कपात करुण घेत आहे . तर कर्जमाफि योजनेचे पैसे कपात करण्यात येउ नये ,टिबक व तुषार चे आनुदान तात्तकाळ देण्यात यावे ,तत्कालीन बँक व्यवस्थापक बियाणी , टिबक व तुषार एजन्ट राम मालेवाड व काळे व तत्कालीन तालुका कृषिधिकारी काळे यांची चौकाशी करावी व दोषिवर दंडआत्मक कार्यवाही करावि या मागणी साठी बरबडा व मणुर येथील शेतकर्‍यांनी उपोषणाचा मार्ग आवलंबला आहे.

    उपोषण करणारे शेतकरी देविदास जेटेवाड , प्रल्हाद शिंदे , पंडित शिंदे , व्यंकटी हांडेवार , पारबतबाई शिंदे , अविनाश शिंदें, गजानन शिंदे , पांडुरंग शिंदे, मारोती मेने, जयवंत मेने ,रामचंद्र शिंदे , गोविंद शिंदे, बाबुराव डुबुसवाड , चंद्रकांत बैलके, दत्ता शिंदे , संभाजी शिंदे, भुजंगराव शिंदे , आनंदा शिंदे , आमृता हांडेवार, गणेश शिंदे, श्यामराव शिंदे, व्यंकटी शिंदे, अंबुबाई शिंदे, भागवत शिंदे, बालाजी शिंदे, आशोक शिंदे, विलास शिंदे, केरबा निलावार ,जलिल शेख, प्रसाद शिंदे ,यांचा समावेश राहणार आहे.