✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.13सप्टेंबर):-लोकसभा मतदार संघात असलेल्या पैनगंगा नदीवर ईसापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास दरवाजे उघडावे लागणार आहे. यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आपत्ती निवारण कक्षास सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष देण्यास हिंगोली चे खासदार श्री.हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.

पर्यावरण, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED