बदलीचा निरोपसमारंभ उरकून जात असताना पोलीसाचा अपघाती मृत्यू

11

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

बीड(दि.14सप्टेंबर):- पोलिस दलातील पोलीस हवालदार महेश आधटराव नेमणूक नेकनूर राहणार दारफळ तालुका माढा हे गेवराई येथे बदली झाल्याने पत्रकार बंधूंनी रात्री त्यांचा निरोप समारंभ केला होता. ते झाल्यानंतर ते नेकनूर वरुन बीडला येत असताना त्यांच्या कारला अपघात होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

सन 2006 मध्ये बीड पोलीस दलामध्ये भरती होऊन त्यांनी पोलीस मुख्यालय,पेठबीड पोलीस स्टेशन, जिल्हा विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, नेकनूर पोलीस स्टेशन अशी 15 वर्ष उल्लेखनीय सेवा दिली. या सेवेमध्ये त्यांना 66 बक्षीस प्राप्त आहेत.त्यांनी कर्तव्यदक्षतेने काम करताना सामाजिक कार्याची जोड जोपासली आहे.नुकतेच लॉक डाउन कालावधीत त्यांनी लिंबागणेश गावात वादळी वाऱ्यामुळे उडालेले वृद्ध दाम्पत्याचे घर पूर्ववत करून देऊन खाकीतील माणुसकी दाखवली होती.