गोंडपीपरी तालुक्यात राष्ट्रवादीकाँग्रेस झाली क्रियाशील

  45

  🔹पारगाव येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

  ✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

  गोंडपीपरी(दि.14सप्टेंबर):-राष्ट्रवादी कांग्रेस सध्या जोमाने आणि नव्या दमांने गोंडपीपरी तालुक्यात क्रियाशील झाली असून प्रत्येक गावा गावात जाऊन पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कांग्रेसचे पद्धधिकारी करीत आहेत .
  अश्यातच आज भंगाराम तळोधी जिल्हा परिषद क्षेत्रात कार्यरत नवं युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने गोंडपीपरी तालुक्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पक्ष संघटन मजबूत करण्यात प्रयत्न करीत आहेत.

  याची-प्रचिती आज पारगाव येथे दिसून आली पारगाव येथील नवयुवक संतोष नारायण आलांम, राकेश आलांम, अविनाश भोयर, कालिदास घोडाम , मोरेश्वर मारोती वराते, रा . पारगाव युवक उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश केला.

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते, अरुण जी वासलवार , नितेश मेश्राम तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस गोंडपीपरी,ओबीसी सेल चे अध्यक्ष कुळे सर सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष प्रमोद दुर्गे यांच्या उपस्तिथीत प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंडपीपरी तालुक्यात ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसून येत आहे.