घरकुल लाभाच्या हप्त्या साठी लाभार्थी मारतात संबंधित विभागाचे चकरा

31

🔸बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले,अनुदान मात्र जुनेच

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना(दि.14सप्टेंबर):-सध्या कोरानाचा कहर चौही कडे असल्यामुळे चार ते पाच महिन्या पासून लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे आणि बांधकाम साहित्याचे भाव अव्वाच्या सव्वा झाले असून घरकुल लाभार्थ्यांना मात्र आधिप्रमाणेच तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने घरकुल लाभार्थी चिंतेत असून आधीच कमी अनुदान आणि त्यात वेळेवर हप्ते मिळत नसल्यानेही घरकुल बांधकाम अर्धवटच राहत असल्याने गरिबांना राहावे कुठे हा प्रश्न पडत आहे.

प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते.प्रत्येक जण घर बांधण्याचे स्वप्न साकारत असतो.मात्र विविध कारणांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही.अशांसाठी शासनाची घरकुल योजना आहे.मात्र आता ही घरकुल योजनाही मृगजळ ठरु पाहत आहे. तुटपुंज्या अनुदानात घरकुल बांधावे तरी कसे असा प्रश्न लाभार्थ्यांना पडल्याचे जिवती तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून घरकुला साठी अनुदान दिले जाते.मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान हे अत्यंत तुटपुंजे आहे.अलीकडे बांधकाम साहित्यात प्रचंड वाढ झाली आहे.रेती, सिमेंट, विटा,लोखंड,मजुरी आदीत झालेली वाढ सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

त्यामुळे सार्वसामान्याचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे.अनेक लाभार्थ्याचे घरकुल अपुर्णावस्थेत असल्याचे तालुक्यात दिसून येते आहे.पहिला टप्पा बांधल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते.परंतुअनेकाचे बजेट पहिल्या टप्प्यातच कोलमडून जाते.घरकुलाचे लाभार्थी ही दारिद्रय रेषेखाली आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाजे घेऊनच घरकुलाचे बांधकाम करावे लागते.त्यातल्या त्यात संबंधित अभियंत्येला कमिशन दिलेल्या शिवाय घरकुलाचा हप्ता मिळत नाही.चौहीकडे भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे.तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजनेसह आदिवासी विकास विभागा मार्फत शबरी घरकुल योजना राबविली जाते.परंतू अगदी तुटपुंजे अनुदान मिळते.या अनुदानात घर कसे बांधावे असा मोठा प्रश्न लाभार्थ्यां पुढे आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक घरकुलाचे बांधकाम रखडले असून शासनाने घरकुलाच्या निधीत भरीव तरतूद करावी.अशी मागणी केली जात आहे.दुसऱ्या टप्यातच अनेकांचे घरकुल अपुर्णावस्थेत असल्याचे दिसून येते.

या अडचणींवर मात करून तिसऱ्या टप्प्याच्या अनुदानासाठी संबंधित विभागात चकरा मारावे लागते.एकी कडे मजूरीवर जावे की शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे असा प्रश्न लाभार्थ्यां पुढे पडलेला असतो.घरकुल लाभार्थ्यांना थांबलेले हप्ते लवकरात लवकर मिळावे आणि घरकुलाचे अपुर्ण बांधकाम पूर्ण व्हावे अशी एक मुखी मागणी घरकुल लाभार्थ्यां कडून केली जात आहे.