नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे यांच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल संजय चौगुले यांचा सन्मान

    43

    ✒️ समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

    सोलापूर(दि.१४सप्टेंबर):-महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक नियंत्रक सय्यद साहेब आणि त्यांच्या टीम मधील संजय चौगुले या धाडसी पोलिस कर्मचाऱ्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याची पार्श्वभूमी गेल्या दोन दिवसा पूर्वी लांबोटी टोल नाक्यावर गॅस ने भरलेला टँकर येत होता परंतु त्यातील असणारा वाहन चालक ड्रायव्हर हा त्याला फेफरी आल्या कारणाने त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले होते आणि त्या ठिकाणी आपल्या कर्तव्य बजावत असलेले संजय चौगुले त्यांचे लक्ष त्या वाहनावर गेले आणि तेव्हा वेडेवाकडे वाहन येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.

    त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सदर वाहनावर त्यांनी चालत्या ताबा घेतला आणि ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन त्या वाहनाला ब्रेक लावून त्यांनी वाहन कंट्रोल मध्ये आणले, मोठा अनर्थ त्यांच्या या धाडसी कर्तुत्वाने त्यांनी तो टाळला आहे त्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते करमाळा दौऱ्यावर जात असताना त्यांनी संजय चौगुले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याबद्दल या धाडसाबद्दल त्यांनी त्यांचं कौतुकही केलं या वेळी वंचित बहुजन आघाडी चे सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, राज्य महामार्ग वाहतुक निरीक्षक सय्यद साहेब, भिमा मस्के, जयराज सागे, व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.