(सु) संवाद पाल्याशी…

35

🔹संस्काराचे मोती

🔸(वयोगट 1 ते 6)

पाल्याशी त्याच्या योग्य वयाप्रमाणे संवाद साधणं हि पालकांसाठी मोठी कसरतच असते, आणि आता हि काळाची गरज झाली आहे.
साधारण पणे मुलांच्या वेगवेगळ्या टप्प्या वरच्या समस्या भिन्न असतात त्या पद्धतीने त्या हाताळणं गरजेचं असतं.
आई आणि बाळाचा संवाद होणं हि आईला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे बाळाला बोलता येत नसताहि तिला सगळं समजत असत, पण खरा संवाद सुरु होतो तो बाळ बोलतं झाल्या पासून!
साधारणपणे मुलांची जडण घडण हि घरातल्या वातावरणा सोबतच त्याच्या स्वतःच्या निरीक्षण आणि आकलन क्षमतेनुसार होत असते. त्यामुळं घरातलं वातावरण त्याच्या वाढीस पोषक ठेवण्या बरोबरच त्याच्या आकलन क्षमतेला वाव देणं ती वाढीस लावणं हि घरातल्यांची जिम्मेदारी असते.
काही छोट्या छोट्या मुद्द्यातून मी टप्पे मांडण्याचे प्रयत्न केलेत..
१. मुलांच्या प्रश्नांना योग्य आणि तात्काळ उत्तरे मिळायला हवीत. त्याच्या प्रश्नाचं निराकरण केल्या नंतर त्यांना त्या संदर्भातील अनेक उदाहरणे देऊन ती गोष्ट पटवून द्यायला हवी तसंच त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण करून द्यायला हवेत जेणे करून त्यांच्या आकलन क्षमते प्रमाणे ते समर्थपणे उत्तर द्यायला शिकतात. स्वतःच असं मत मांडण्याची वृत्ती विकसित होते.
२. कृतीच्या परिणामाची जाणीव करून देणे..
मुले खोड्या करतात झाडाची पानं तोडतात पाणी सांडतात तेव्हा त्यांना ओरडण्या ऐवजी परीणामाची जाणीव करून देता यायला हवी.
मुलांना पाणी संडायची सवय असते बऱ्याच वेळा ओरडून पण फार परिणाम दिसत नाही. पण त्यांना स्लोगन शिकवा “सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ” त्याला त्याचा अर्थ समजेलच असं नाही, पण पाण्याचा मेन सप्लाय बंद करा आणि त्याला वारंवार जाणीव करून द्या की तू पाणी सांडलं म्हणून आता पाणी संपलं. तो स्वतः सांगायला लागेल की पाणी सेव्ह करू. .करून पहा!.आपण अश्या अनेक उदाहरणातून त्यांना शिकवू शकतो आणि त्याचे परिमाण खूप चांगले येतात.
३. शिस्त हवी पण त्याचा बागुलबुवा नको.
अनेक पालक शिस्त लावायची म्हणून मुलांना अवास्तव धाकात ठेवतात ओरडतात पण साधारण दोन अडीच वर्षांपासून आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकतो. , बाहेर जाताना दिवे पंखे बंद करायची सवय लावू शकतो आणि मुले पटकन शिक तात. मुलं पसारा करतात घाण करतात तेव्हा ते अवरायची सवय लावा त्याच्या पुढे काल्पनिक किंवा त्यांच्याच मित्र मैत्रिणीतील एक रोल मॉडेल तयार करा आणि ती किंवा तो गुड बॉय /गर्ल आहे स्वतःची खेळणी पुस्तकं आवरून ठेवतात असं सांगा फार पटकन परिणाम होतो.
४. अनावर क्रोध.
कधी कधी मुलं संतापतात अचानक आक्रस्ताळे पणा करतात. तेंव्हा अनेकदा असं होत की पालक त्यांच्या मनाप्रमाणे ऐकतात त्यांना हवं ते देऊ करतात किंवा ओरडतात धपाटा घालतात पण ह्या दोन्हीतून जे साधायचं ते साध्य होत नाहीच तर मुलं पुढच्यावेळी तेच हत्यार आपल्यावर वापरतात.
तेव्हा शक्य तेवढं शांत राहून त्यांच्या कानात कुजबुज करा काहीही, ते आपलं ऐकण्यासाठी शांत होतात, आणि नंतर शांतपणे तू शांत रहा किंवा रडू नको हे वारंवार संथ शब्दात सांगा त्या संथ लईमुळे मूलं शांत होतात.
मूल हट्टी व्हायला नको असेल तर प्रथम मॉल मध्ये नेणं कटाक्षानं टाळा, त्यांच्या हट्टाची सुरवात इथून होते. आपण आपली खरेदी करतो आणि ते ती पाहून त्याच्या वस्तूची यादी करतात. दोघांपैकी कोणी एकान सामान खरेदी करा . महिन्यातून एकदाच त्याला हवं ते चॉकलेट ,बिस्कीट एखादी खेळणी आणून द्या तीच शिस्त असू द्या. पूर्वी असाच शिरस्ता असायचा आता पावलो पावली स्टोअर्स झाले अन् मुलांची शिस्त बिघडली.
मोबाईल ,टीव्ही यांचा कमीत कमी वापर करा. चॅनेल्स लॉक करा ठराविक वेळेपुरती बघू द्या.
५. आपण पालक असतानाच इतर अनेक नाती निभावत असतो, केवळ आदर्श बनून किंवा आयडॉल राहणं शक्य नसतं शक्यतोवर मुलांसमोर वाद विवाद टाळावेत पण कधी असं होत की वाद होतात घरात. अश्या वेळी त्यांना समजेल अश्या भाषेत योग्य प्रकारे कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न करावा, हे करत असताना कोण चूक कोण बरोबर किंवा माझंच कसं बरोबर अश्या गोष्टी टाळाव्यात. हे घडत असताना त्यांना काय वाटलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा.
६. सकारात्मकता ठेवा .
नेहमी मुलांना दोष देणं टाळा.
सकारात्मक बोला, तू ऐकत नाहीस म्हणण्या पेक्षा बाळ किती शहाणं आहे सगळं एकतं!! अश्या वाक्यांचा वापर करा .
७. नुसत्या पाठांतरावर भर नको.
हल्ली अनेक पालक मुलांकडून श्लोक वेगैरे पाठ करवून घेतात ती चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्या अर्थ समजावून देऊन ती दैनंदिन जीवनाशी रिलेट करण्यावर भर द्यावा अश्या गोष्टी कायम लक्षात राहतात.
याचं खूप छान उदाहरण देऊ इच्छिते मी
मी बारावीत असताना आम्हाला फिजिक्स ला एक सर होते त्यांनी एक गीतेतील एक श्लोक Induced emf सोबत रिलेट केला होता तो असा-
Whenever magnetic flux changes emf will induced

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानम स्रुजाम्यहम्।।
अर्थात याचा तसा संबंध नाहि पण दोन्ही गोष्टीतील मेळ साधून द्यायचं काम त्यांनी केलं जे अजूनही लक्षात आहे…
यश अपयश यांच्याकडे समतोल वृत्तीने पहा, कोणतेही कर्म करताना चिकाटी सोडू नका असं कृष्णनं गीतेत सांगितलं आहे.
गीतेची शिकवण आपण बालक-पालक संदर्भात वापरायला शिकायला हवं.
आपल्या मुलांवर प्रेम करण्यासाठी ते जस आहे तसं स्वीकारण्याची तयारी असेल तरच मुलांचं संगोपन योग्य प्रकारे होऊ शकतं….
©®
✒️लेखिका:-सौ. सायली कस्तुरे- बोर्डे,पुणे
मो:-9405075222

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
(अहमदनगर विशेष प्रतिनिधी)
मो:-9404322931