✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आल्लापल्ली(14सप्टेंबर):- उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे एका रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज आहे असा व्हाट्सअप ग्रुप वर रक्तदानासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असलेला टायगर ग्रुप द्वारे माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपजिल्हा रुग्णालय अहेरी गाठून गरजवंतांना भेटून रक्तदान केले.
अहेरी तालुक्यातील राजाराम येथील चिनक्का बेझलवार या महिलेला काही दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती करण्यात आला.

आज एकाएकी रक्ताची गरज भासली. त्यामुळे त्यांचा परिवारातील सदस्यांनी रक्तदात्यांना संपर्क करण्याचा प्रयंत्न केला असता गडचिरोली जिल्ह्यात रक्तदानासाठी अग्रेसर असलेला टायगर ग्रुप यांना माहिती मिळाली. त्यांनी त्यांचा स्वतःचा व्हाट्सअप ग्रुप वर माहिती दिली. याच माहितीचा आधारे धनश्री ग्रुप चे सीइओ राजअनिल पोचमपल्लीवार यांनी चिनक्का बेझलवार यांना रक्तदान केले.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED