अतिक्रमण व ग्रामसेवक बदली संदर्भात सिरसाळा ग्रामपंचायत समोर अमरण उपोषण

32

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.14सप्टेंबर):-सिरसाळा येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवणे व ह्या अतिक्रमणा बाबत दुटप्पी, संशयास्पद भूमीका घेणारे ग्रामसेवक शेख अब्दुला यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणी साठी ग्रामस्थ धर्मा मेंडके, मिलिंद चोपडे, केशव बन्सोडे दिनांक १४ सप्टेंबर रोजी पासुन सकाळी ११ वाजल्या पासुन अमरण उपोषणास सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाय समोर बसले आहेत.

सन २०१२ साली तत्कालीन बीड जिल्हा अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी येथील अतिक्रमण हटवले होते. तदनंतर काही दिवसातच या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले. यामुळे रेणूका भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या.
परिस्थिती लक्षात घेत ३ मार्च २०१४ रोजी तत्कालीन सरपंच सौ. वैजयंतीबाई वैद्यनाथ देशमुक यांनी संबंधित हे अतिक्रमण हटवण्याचा ठराव घेतला होता. ह्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी धर्मा मेंडके सह संतोष पांडे, व्यंकटेश काळे,आश्रूबा काळे, लतीफ पट्टेदार यांनी गेल्या वर्ष भरा पुर्वी केली .
सतत मागणी लावून धरल्याने तालुका प्रशासनाच्या आदेशान्वे मंडळ अधिकारी शेख, तलाठी सोळंके सह अन्य. यांनी संबंधित ठिकाणी चा पंचनामा केला. ह्या पंचनाम्यात ग्रामसेवक शेख अब्दुला यांनी सन २०११ चा शासन निर्णय सांगत संबंधित अतिक्रमण वाचवण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे. व ह्या अतिक्रमणा बाबत सतत दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली आहे. एक सरकारी व्यक्ती असतांना अतिक्रमणाची पाठराखण करणे योग्य नाही. म्हणून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी व संबंधित अतिक्रमण हटवण्यात यावे अशा मागणी साठी सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाय समोर ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. उशीरा पर्यंत उपोषण सुरुच होते.

ह्या उपोषणास प्रशासकिय मंडळ अधिकारी मुंडे, तलाठी सोळंके तसेच राजकिय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे, भाजपा किसान सभा प्रदेश सदस्य उत्तम माने तसेच बाळासाहेब फड, दिपक नागरगोजे, हनूमंतराव पवार, पत्रकार दत्ताजी काळे, पत्रकार महादेव शिंदे, पत्रकार महादेव गित्ते, ग्रामस्थ आक्रम पठान, मधुकर किरवले, मुन्ना काळे सर, तौफिक भाई सिद्दीकी, विशाल जाधव, नितीन कदम रफिक पठान, रविंद्र आरसुळे, शेख नेहाल मनियार,राहुल देशमुख, ललवाणी पारसमल,दिलीप पुरी, महम्मद इनामदार, शेख नासर दादा, प्रविण सिरसाट आदीसह अनेक जणांनी ह्या अमरण उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला आहे.