गढी येथील जय भवानी मंदिरात धाडसी चोरी

  50

  ✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

  गेवराई(दि.14सप्टेंबर):- तालुक्यातील गढी येथील जयभवानी मंदिरात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. आज सोमवारी (दि.14) पहाटे एक ते दीडच्या दरम्यान मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील एक पितळी मूर्ती तसेच रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
  या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
  गेवराई तालुक्यातील गढी येथे भवानी देवीचे जाज्वल्य मंदिर आहे.धुळे-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग लगत हे भव्य मंदिर उभारलेले आहे. अनेक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात सध्या सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद असल्याने जय भवानी मंदिर बंद आहे.

  या मंदिरात सुरक्षारक्षकही बंदोबस्तावर असतात मात्र घटना घडली तेव्हा याठिकाणी सुरक्षारक्षक उपस्थित नव्हते अशी माहिती समोर आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी रोख रकमेसह दाग दागिने व एक पितळी मूर्ती चोरून नेली आहे.

  मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गेवराईचे पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत व पथकातील अधिकारी कर्मचारी मंदिरात दाखल झाले पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.