सकल मराठा समाजाने एकत्र येऊन आरक्षणासंदर्भात लढा द्यावा – मारोतराव कवळे गुरुजी

26

✒️माधव शिंदे (नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-775707326

नांदेड(दि.14सप्टेंबर):-सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मराठा समाजाला आरक्षणला स्थगिती दिली आहे ,मराठा समाजाचे आरक्षण टिकून राहण्यासाठी सकल मराठा समाजाने एकत्र येऊन लढा द्यावा असे आव्हान नायगाव मतदार संघाचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले आहे.

तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने ७२ टक्के पर्यंत आरक्षण दिले आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यात त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपला लढा असणार असल्याचे मारोतराव कवळे गुरुजीने म्हणाले.

दरम्यान यासंदर्भात राज्यसरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण सकल मराठा समाजाने एकत्र येऊन पक्ष पक्षाचे राजकारण सोडून निपक्ष लढा उभारण्याची गरज असल्याचे कवळे गुरुजी यांनी म्हंटले आहे,आरक्षणासाठी संपूर्ण समाज एकत्र करून मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू असे हि कवळे गुरुजी म्हणाले .

नीट परीक्षेचा समाजाच्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा
मराठा आरक्षण स्थगितीच्या पूर्वीच नीट परीक्षेचे फॉर्म भरण्यात आले होते यासाठी मराठा समाजाच्या विद्यर्थचे कोणतेही नुकसान होऊ नये नीट २०२० परीक्षेत आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या विद्यर्थ्यांना मिळावा यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही नायगाव मतदार संघाचे मारोतराव कवळे गुरुजी यांनी दिली आहे.