🔸सोशलमिडीयात सकारात्मक प्रतिक्रिया !!

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलीआहे. यानिर्णयामुळे मराठा समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप सेना कॉंग्रेस राष्ट्रवादी हे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपण करत सुटले आहेत. यातील नेमके खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहेत याचा नेमका अंदाज सामान्य मराठा माणसाला येत नव्हता.

अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षण तद्वतच मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत ? याबाबत काल खरी परिस्थिती विषद केली आहे. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात,

“महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल”.

बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका मिडीयाने प्रसिद्ध केली.प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशलमिडीयात प्रसिद्ध झालेल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेचे मराठा समाजाने खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे आणि त्यांचे समर्थन सुध्दा केले आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेवर मराठा समाजातील लोकांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

गरीब मराठ्यांचा श्रीमंत मराठ्यांनी फक्त मिठा सारखा उपयोग करून घेतला आणि श्रीमंत मराठ्यांनी वंशपरंपरेने आपल्या कुटुंबात राजकीय सत्ता कैद करून ठेवली आहे याची सत्यता हळूहळू गरीब मराठ्यांना पटत आहे.गरीब मराठ्यांची जी अवस्था झाली आहे त्याला केवळ श्रीमंत मराठेच जबाबदार आहेत असेही गरीब मराठा माणूस उघडपणे बोलायला लागला आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासूनच अॅड बाळासाहेब आंबेडकर सकारात्मक भूमिका घेतलेली आहे.कोपोर्डि घटना आणि मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाबाबत काढलेल्या विराट मोर्चांना तात्कालिन भाजपा प्रणीत राज्य सरकार खूप हादरले होते. आंदोलनात फूट पाडून ते कमजोर करण्यासाठी सरकारने नानाविध हतखंडे वापरले होते.मराठा आणि बौद्ध समात गैरसमज वाद संघर्ष पेटवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. या षढयंत्राला उघडे पाडून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र दुभंगण्यापासून वाचविला होता.

१)”इतर समाजाला न्याय हक्क मागण्यांसाठी जसे अधिकार आहेत तसेच मराठा समाजाला सुध्दा त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोर्चे आंदोलने करण्याचा संवैधानिक अधिकार आहे” २)”मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून ते सरकारच्या विरोधात आहेत”३)” मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे काढत आहेत ते कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत त्यामुळे इतर समाजाने प्रतिमोर्चे काढू नयेत” अशी स्पष्ट भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी घेतली होती.

परिणामी प्रतिमोर्चे निघाले नाहीत, पेटवापेटवीचे राजकारण्यांना उघडे पाडले.मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जातीय संघर्ष टळला हे केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक नेतृत्वामुळे घडले.

एवढ्यावरच बाळासाहेब थांबले नाहीत तर मराठा समाजाला आरक्षण कशा पध्दतीने मिळू शकते, कायद्यातील कोणत्या तरतुदी आधारे आरक्षण मिळू शकते याबाबत कायद्याचे तज्ञ म्हणून त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

आता सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अचानक- अकलनीय दृष्टीने स्थगिती दिली आहे या पार्श्वभूमीवर काल बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत ? याबाबत जी भूमिका मांडली आहे त्याचे गरीब मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.

✒️लेखक:-सुरेश शिरसाट,
(राजकीय विश्लेषक,अकोला जिल्हा )
मो-9850358305

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका विशेष प्रतिनिधी)
मो- 8080942185

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED