शिराज काझी यांच्या हस्ते गरजूंना धान्य किट चे वाटप

  38

  ✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

  उस्मानाबाद(दि.15सप्टेंबर)’-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा शिराज काझी ( आय.टी शेल जिल्हा प्रमुख वंबआ उ,बाद) यांच्या हस्ते१३ गरजू कुटुंबांना किराणा मालचे वाटप दि १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
  वंचित बहुजन आघाडी च्यावतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत असून आजचा१५७ वा दिवस होता. तर आजपर्यंत२८११ गरजुवंत कुटूंबांना अन्नधान्य वाटप केले आहे.

  वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे मार्गदर्शनाखाली हे वितरणप करण्यात येत आहे.

  या वाटपाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे जीवन कदम, सुरेश चौधरी किरण गायकवाड ,दिनेश साळवे कृष्णा लोंढे सुरेश मस्के उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश तुळशीदास कदम यांनी तर उपस्थितांचे आभार नागेश कदम यांनी मानले.