शब्दशृंगार साहित्य मंच,आयोजीत स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

6

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.15सप्टेंबर):- साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या शब्दशृंगार साहित्य मंच महाराष्ट्र ,या समूहात स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये महाराष्ट्रातील अनेक नवोदित व सुप्रसिद्ध नामवंत साहीत्यीकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला भव्य दिव्यं रूप प्राप्त करुन दिले होते .या स्पर्धेचा निकाल सोमवार दि.१४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता समुह प्रमुख विशाल पाटील सर यांनी अनेक साहित्यीकांच्या ऑनलाईन उपस्थीत जाहीर करुन विजेत्यांना रोख रक्कमेसह सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले .

या स्पर्धेत प्रथम सन्मानाचे मानकरी कवियत्री प्रिती पाटील,
खारघर, नवी मुंबई.सन्मानपत्र व रोख ५०१ रु. , द्वतीय: कवि लीलाधर दवंडे कामठी, नागपूर. सन्मानपत्र व रोख ३०१ रु.तृतीय:- कवियत्री सौ. सीमा भांदर्गे, अमरावती.सन्मानपत्र व रोख १०१ रु.आणी उत्तेजनार्थ:- कवि दिलीप विठ्ठलराव थुल, पुलगाव, वर्धा सन्मानपत्र व रोख १०१ रु.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन सुप्रसिद्ध कवि/लेखक श्री. हरिदास कोष्टी, सर.यांचे योगदान लाभले , आणी स्पर्धचे आयोजन कवि/लेखक श्री. प्रदिप हिवरखेडे यांनी केले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक नवोदितांनी व सुप्रसिद्ध लेखकांनी तब्बल २०० कवींनी सहभाग नोंदवला होता. त्यातील निवडक रचनाचे लवकर ई काव्यसंग्रह शब्दशृंगार साहित्य मंच,प्रकाशित करणार आहे. तसेच “शब्दशृंगार साहित्य मंच” गुगल पोर्टल सुध्दा पुर्ण होण्यास आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक नवेदीत साहित्यिकांना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळवण्याचं काम “शब्दशृंगार साहित्य मंच”चे संस्थापक मा.श्री.विशाल पाटील ,वेरुळकर सर यांनी करत आहेत!