चिमूर नगर परिषद चा ढिसाळ कारभार,कोरोना सनियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश

29

🔺कांग्रेस चे पपु शेख यांचा आरोप

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.15सप्टेंबर):- नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या वाढ होत आहे तेव्हा कोरोना वर नियंत्रण किंवा व्यवस्थापन ठेवण्यात पाहिजे तेवढे यश येत नसल्याचे निदर्शनास येत आहे कोरोना रुग्ण संख्या वाढीत असताना कोविड सेंटर ची व्यवस्था किती आणि कशी पुन्हा कोठे वाढविता येईल याची सुद्धा दखल घेत नाही भविष्यात नप प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने कोरोना चा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत असल्याने नप प्रशासनाने कडक शिस्त अंमलबजावणी करण्याची मागणी कांग्रेस चे पप्पू शेख यांनी केली आहे.

चिमूर नगर परिषद क्षेत्रात कोरोना रुग्ण संख्या वाढ होत असल्याने कोरोना सेंटर मधील व्यवस्था मात्र अपुरी पडत असल्याने कोरोना रुग्णांना होम कोरोन्टीन ठेवण्यात येत आहे परंतु त्या संबंधित कोरोना रुग्णाचे घर ,परिसर सील करण्यात येत नाही त्या कोरोना कुटूंबियावर नियंत्रण ठेवल्या जात नाही तेव्हा ते कोरोना रुग्ण खुलेआम गावात फिरत आहे तेव्हा पुन्हा कोरोना चा भडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही असाच प्रकार प्रभाग४ मध्ये घटना घडली असता याची तात्काळ नप प्रशासकीय अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी पुढील कारवाई केली परंतु कोणी सांगेल नंतर कारवाई होईल याकडे न बघता नप प्रशासन ने कोरोना रुग्णाचे घर कडक सील करून त्यावर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे.

तसेच शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉक डाउन करीत आहे दुकाने सुरू असल्याने कोरोना वाढत असल्याचे समजून लाकडाऊन ठेवण्यात आले आहे परंतु गाव वस्तीत खुलेआम दारू भट्टी सारखे दुकाने सुरू आहे मग त्या दुकानामुळे कोरोना होत नाही का ? असा सवाल करीत लॉकडाउन सर्वत्र बंद ठेवण्यात नगर परिषद ने यंत्रणा राबविण्यात यावी आणि कोरोना रुग्णांची वाढ न होता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक शिस्त अंमलबजावणी करण्याची मागणी कांग्रेस कार्यकर्ते पप्पू शेख यांनी केली .

चिमूर नगर परिषद क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मात्र नप प्रशासन सुस्त दिसत आहे.कोरोना रुग्ण वाढत असल्याने आजु बाजू असलेले कुटुंबात भीती निर्माण होत आहे
नगर परिषद क्षेत्रात सॅनिटाईजर फवारणी करण्याची मागणी कांग्रेस चे पप्पू शेख यांनी केली.