पब्लिक पोलीस चॅरिटेबल ट्रस्ट च्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी अनिलभाई गांगुर्डे यांची निवड

  37

  ?भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मा.मुख्य न्यायाधीश जस्टीस के.जी बालकृष्णन यांनी केली निवड

  ✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

  नाशिक(दि.15सप्टेंबर):-नुकतीच नवी दिल्ली येथे पब्लिक पोलीस चॅरिटेबल ट्रस्टची बैठक ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष भारताचे पुर्व मुख्य न्यायाधीश तथा राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे पुर्व चेअरमन श्री.न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,यात जेष्ठ समाजसेवक तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची महाराष्ट्राच्या प्रदेश समन्वयक पदी सर्वांनूमते नेमणूक करण्यात आली
  अनुमोदन श्री.देवदत्ता (Rtd.IAS तथा पुर्व सचिव उत्तर प्रदेश यांनी दिले.
  पब्लिक पोलीस (NGO) चे उद्दिष्ट जनता आणि पोलीस यांच्यात सलोखा निर्माण करून एक दुसऱ्याला मदत करुन देशात अपराध कमी करण्याचे प्रमुख ध्येय ह्या संस्थेचे आहेत.

  ह्या बैठकीस जस्टीस डॉ.सतीश चंन्द्रा, श्री.व्ही.एन.सिंग(रिटायर I.P.S), श्री.आदित्य आर्या माजी पोलीस महासंचालक गोवा, डॉ.विक्रम सिंग पुर्व पोलीस महासंचालक उत्तरप्रदेश , श्री.आंनंद शुक्ला माजी पोलीस महासंचालक राज्यस्थान, व्हाईस चेअरमन धमेन्द्र देव मिश्रा I.A.S(रिटायर)पुर्व चेअरमन बोर्ड ऑफ रेवन्यु उत्तर प्रदेश , चीफ ऑफिसर श्री. राकेश कुमार माहेश्वरी सिनियर चार्टंट आकाऊंटंट, जॉईंन सेक्रेटरी श्री. राम करण वर्मा, जॉईन सेक्रेटरी इलेक्ट्रॉनिक्स डिपारमेंट भारत सरकार श्री. तन्वीर जाफर आली,पुर्व डिवीजन कमीशनर उत्तर प्रदेश आदी मान्यवर उपस्थित होते.

  अनिलभाई गांगुर्डे हे नाशिक जिल्ह्याचे भूमीपुत्र असल्याने व जेष्ठ समाजसेवक असल्याने ह्या नेमणूकी बद्दल महाराष्ट्रातील तमाम IPS व IAS अधिकाऱ्यांनी अनिलभाई गांगुर्डे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.