✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.15सप्टेंबर):-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी राज्या्त 15 सप्टेंबबर पासून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिम नांदेड जिल्ह्या मध्ये् यशस्वीरित्या व प्रभावीपणे राबविण्याजसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुक्ष्मा नियोजन करण्यामत आले आहे. या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ जिल्हा् परिषद अध्यिक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते‍ भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, पंचायत समिती सभापती श्रीमती निता राऊलवाड, सरपंच श्रीमती रत्नरमाला शिंगेवाड, डॉ. शिवशक्तीव पवार, प्रशासकिय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, जिल्हा परिषदेचे माहिती अधिकारी सुभाष खाकरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. डोंगरे उपस्थित राहणार आहेत.

या मोहिमेसाठी गावानिहाय पथकांची स्थारना करण्यात येऊन दरदिवशी किमान 50 घरामधील व्य्क्तींेची चौकशी तसेच पल्सी ऑक्सीहमीटर व थर्मल गनच्या सहाय्याने तपासणी करण्यािचे नियोजन करण्यामत आले आहे. जिल्ह्या तील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यातसाठी सहवासितांचा शोध व तपासण्याय अधिक प्रमाणात करण्याीबरोबरच अलगीकरणावर प्रशासनाने भर दिला आहे. “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिमेत सर्व नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED