आलापल्ली शहरात 17 सप्टेंबर पासुन दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहणार

15

✒️संतोष संगीडवार(आलापल्ली प्रतिनिधी)

मो:-7972265275

आलापल्ली(दि.15सप्टेंबर):-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज व्यापारी संघटना, आलापल्ली यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, ह्या बैठकीत सद्याच्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यानंतर दि.17 सप्टेंबर पासून आलापल्ली शहरातील सर्व दुकाने व बाजारपेठ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला..!!

आलापल्ली शहरातील सर्व व्यापारी व ग्राहकांनी मास्क घालावे, सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करावे, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात सेनेटायजर ठेवावे असेही ह्यावेळी ठरविण्यात आले आहे, तसेच संध्याकाळी 5 नंतर कोणीही दुकाने चालू ठेवल्यास त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केल्यास त्यासाठी ते स्वतः जिम्मेदार राहील असेही ह्यावेळी ठरविण्यात आले आहे..!!

पुढील 8 दिवसानंतर पुन्हा बैठक घेऊन, त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ही ह्यावेळी ठरविण्यात आले,ह्याची अल्लापल्ली शहरातील सर्व व्यापारी, ग्राहक व नागरिकांनी नोंद घ्यावे असे आवाहन व्यापारी संघटना आलापल्ली ह्यांनी केले आहे..!!