✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.15सप्टेंबर):-गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शेतकरी राजा हा बँकेचे बँकेच्या पायऱ्या झिजवत आहे परंतु बँक अधिकारी हे विनाकारण शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा काम करत आहेत यापुढे दर शेतकऱ्यांना वेठीस धरले तर याद राखा असा सवाल करत धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धपत्रक दिले आहे पुढे दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की शेतकरी हे खूप हवालदिल झालेले असून आर्थिक टंचाई मध्ये सापडलेले आहेत.

त्यामुळे तात्काळ मंजूर करावे अन्यथा लोकशाही मार्गाने वडवणी तालुक्यातील विविध बँकांच्या शाखा समोर आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे वडवणी तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा ऊस तोडण्यासाठी राज्यांमध्ये जात आहे त्यांना देखील बँक अधिकाऱ्याकडून वेळोवेळी पीक कर्जाच्या बाबतीमध्ये वेठीस धरले जात आहे गेल्या दोन दोन तीन तीन महिन्याच्या पुढील तारखा देऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी वेठीस धरण्याचे काम शाखा अधिकारी व बँक मॅनेजर हे करत आहेत.

त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मंजूर केले नाही तर वडवणी तालुक्यातील चिंचवण वडवणी देवळा यासह आदी गावातील शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज ना दिल्यास बँकांच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने समाविष्ट करून बँकांना जॉब विचारणार आहे असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED